नाशिक (प्रतिनिधी) : क्रिकेट खेळताना तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल कॉलेज रोड परिसरात घडली. आकाश रवींद्र वाटेकर (वय ३२, रा. राणेनगर) असे या तरुणाचे नाव आहे.
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा काल दुपारी एनबीटी लॉ महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना त्यास अस्वस्थ वाटू लागले. नंतर छातीत दुखूत असल्याने तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्यास त्याच्या मित्रांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी आकाशला तपासून मृत घोषित केले. या घटनेने सहकार्यांना धक्का बसला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश हा विधी शाखेच्या अखेरच्या वर्षात शिकत होता.