नाशिक (प्रतिनिधी )- नाशिकची खेळाडू ईश्वरी सावकारची महाराष्ट्र सीनियर क्रिकेट संघात निवड झाली आहे.

तिच्या या निवडीमुळे नाशिक क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नाशिक क्रिकेटची महिला क्रिकेटपटू सावकार हिची t20 सामन्यासाठी महाराष्ट्राच्या सीनियर संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा आणि सचिव समीर रकटे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

यापूर्वीही ईश्वरी 19 वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघात खेळली आहे. ईश्वरीला प्रशिक्षक मंगेश शिरसाट आणि भावना गवळी यांचे प्रशिक्षण लाभले आहे.