राष्ट्रीय पातळीवर नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंचा दबदबा कायम; रसिका शिंदेची अष्टपैलू कामगिरी

नाशिक (प्रतिनिधी) :- उत्तर प्रदेश मधील जोनपुर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या महिलांनी आपला दबदबा कायम ठेवला. पुणे विद्यापीठाच्या संघाकडून खेळताना नाशिकच्या रसिका शिंदेने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजीत तिने बारा धावांमध्ये तीन गडी बाद केले.

बिहार विद्यापीठ विरुद्ध पुणे विद्यापीठ असा महिलांचा टी ट्वेन्टी क्रिकेट सामना आज झाला. रसिका शिंदेच्या जोरदार माऱ्यापुढे बिहार विद्यापीठाच्या संघाला वीस षटकात एकूण 90 धावा केल्या. विद्यापीठाने हे आव्हान सतरा षटकांत पूर्ण केले. या सामन्यात नाशिकच्या रसिका शिंदे, साक्षी कानडी आणि प्रियंका घोडके यांनी उत्तम कामगिरी केली. रसिका शिंदेने चार षटकात एक निर्धाव टाकत 12 धावा देत तीन गडी बाद केले.

फलंदाजीत तिने नाबाद पाच धावा केल्या तर साक्षी कानडीने 2 चौकारांसह वीस धावा केल्या. तर प्रियंका घोडके हिने तीन चौकारासह 28 धावा केल्या. नाशिककर महिलांच्या कामगिरीच्या जोरावर पुणे विद्यापीठाने उपांत्य फेरी गाठली उद्या बुधवारी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना रोहतक विद्यापीठा विरुद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!