नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत कोरोनाचा कहर सुरूच

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ११५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १७ हजार ०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८८५, बागलाण २९५, चांदवड २९१, देवळा ३९१, दिंडोरी ३९५, इगतपुरी २०४, कळवण २२७, मालेगाव २७१, नांदगाव २७४, निफाड ८४५, पेठ १२४, सिन्नर ५७९, सुरगाणा १०२, त्र्यंबकेश्वर १९६, येवला २२६ असे एकूण ५ हजार ३०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार ३७९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २३८ तर जिल्ह्याबाहेरील १५० रुग्ण असून असे एकूण १७ हजार ०७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६१ हजार ९८४ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १३४, बागलाण ५७ , चांदवड ६७, देवळा ८९, दिंडोरी ४१, इगतपुरी २७, कळवण ५६, मालेगाव ५७, नांदगाव ४८, निफाड ८२, पेठ २१, सिन्नर ४९, सुरगाणा १५, त्र्यंबकेश्वर ३३, येवला १३ असे एकूण ७८९ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.४१ टक्के, नाशिक शहरात ९४.१९ टक्के, मालेगाव मध्ये ९५.६४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.५० टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.४० इतके आहे.

मृत्यु

नाशिक ग्रामीण ४ हजार २६२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ५०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५९ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७९७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय

४ लाख ६१ हजार ९८४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ३६ हजार ११५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १७ हजार ०७२ पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.४० टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!