नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ‘एवढे’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

सद्यस्थितीत १४ हजार ८४८ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४३ हजार १०९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १४ हजार ८४८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७०१ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८११, बागलाण २८७, चांदवड ३३३, देवळा ३८१, दिंडोरी ३४५, इगतपुरी १७१, कळवण १९५, मालेगाव २५६, नांदगाव १९८, निफाड ६८१, पेठ ११७, सिन्नर ४८५, सुरगाणा ११०, त्र्यंबकेश्वर १५३, येवला १६९ असे एकूण ४ हजार ६९२ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ०९ हजार ६७२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २५० तर जिल्ह्याबाहेरील २३४ रुग्ण असून असे एकूण १४ हजार ८४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६६ हजार ७६९ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १००, बागलाण ५१ , चांदवड ६७, देवळा ६९, दिंडोरी ५०, इगतपुरी २२, कळवण ३१, मालेगाव ५७, नांदगाव ०५, निफाड ११३, पेठ २५, सिन्नर ८८, सुरगाणा २८, त्र्यंबकेश्वर २६, येवला १८ असे एकूण ७५० पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.८२ टक्के, नाशिक शहरात ९४.८८ टक्के, मालेगाव मध्ये ९५.५६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.५० टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९३ इतके आहे.

मृत्यु

नाशिक ग्रामीण ४ हजार २६८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३६१ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय

४ लाख ६६ हजार ७६९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ४३ हजार १०९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १४ हजार ८४८ पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.९३ टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!