नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ‘एवढ्या’ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४० हजार ९२४ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार ९२४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत १५ हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ४५१ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८६३, बागलाण २९०, चांदवड ३०१, देवळा ३३५, दिंडोरी ३४८, इगतपुरी १३५, कळवण २३५, मालेगाव २५४, नांदगाव २०६, निफाड ६६५, पेठ ११०, सिन्नर ४४९, सुरगाणा १०२, त्र्यंबकेश्वर १५०, येवला १६८ असे एकूण ४ हजार ६११ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १० हजार ४३६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २९३ तर जिल्ह्याबाहेरील २१० रुग्ण असून असे एकूण १५ हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६५ हजार २७९ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४३, बागलाण १२ , चांदवड १०, देवळा ०६, दिंडोरी १९, इगतपुरी १८, कळवण ०२, मालेगाव ०७, नांदगाव ०३, निफाड ४३, पेठ ०३, सिन्नर ३३, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०५, येवला १० असे एकूण २१४ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.८४ टक्के, नाशिक शहरात ९४.५८ टक्के, मालेगाव मध्ये ९५.२५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.७९ टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.७७ इतके आहे.

मृत्यु

नाशिक ग्रामीण ४ हजार २६६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३६० व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८०६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय

४ लाख ६५ हजार २७९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ४० हजार ९२४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १५ हजार ५४९ पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.७७ टक्के.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!