नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ‘एवढ्या’ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३३ हजार २१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १७ हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९०८, बागलाण २९१, चांदवड २८५, देवळा ३८०, दिंडोरी ४२२, इगतपुरी २१६, कळवण २३४, मालेगाव २७७, नांदगाव २३७, निफाड ८७०, पेठ १०४, सिन्नर ६४७, सुरगाणा ७२, त्र्यंबकेश्वर १६६, येवला २५८ असे एकूण ५ हजार ३८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार ४८१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २७५ तर जिल्ह्याबाहेरील १७८ रुग्ण असून असे एकूण १७ हजार ३२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ३२८ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २५७, बागलाण ५३ , चांदवड ८९, देवळा ९०, दिंडोरी ९१, इगतपुरी ३२, कळवण ४९, मालेगाव ४५, नांदगाव २६, निफाड २१०, पेठ ३७, सिन्नर १५६, सुरगाणा ३८, त्र्यंबकेश्वर ५०, येवला ६४ असे एकूण १ हजार २८७ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.३४ टक्के, नाशिक शहरात ९४.११ टक्के, मालेगाव मध्ये ९५.३७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.११ टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.३१ इतके आहे.

मृत्यु

नाशिक ग्रामीण ४ हजार २६० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७९२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय

४ लाख ५९ हजार ३२८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ३३ हजार २१५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १७ हजार ३२१ पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.३१ टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!