Home क्राईम वृद्धेच्या पर्समधून १२५० अमेरिकन डॉलरसह पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

वृद्धेच्या पर्समधून १२५० अमेरिकन डॉलरसह पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : बस प्रवासात वृद्धेच्या पर्समधील सुमारे पावणेतीन लाखांचे सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी अरुणा विलास कासलीवाल (वय 62, रा. पूजा पार्क रो-हाऊस, शुभम् पार्कजवळ, अंबड लिंक रोड) या 16 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता नाशिकरोड ते शुभम् पार्क बस स्टॉप असा बसने प्रवास करीत होत्या. यादरम्यान अज्ञात चोरट्याने कासलीवाल यांच्या बॅगेतील प्लास्टिकच्या पिशवीमधील पर्समधील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 45 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या चेन, 30 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे झुमके, 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे सेवन पीस, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, अडीच हजार रुपये किमतीची चांदीची देवाची माळ यासह 87 हजार 500 रुपये रोख व 1250 अमेरिकन डॉलर असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर कासलीवाल यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.