Home क्राईम क्लिनिकसह मेडिकल दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

क्लिनिकसह मेडिकल दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

0


नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : क्लिनिकच्या शटरचे कान कशाच्या तरी सहाय्याने कापून मेडिकल दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे 1 लाख 37 हजारांचा ऐवज व रोकड लंपास केली आहे.

पवन प्रेमचंद उत्तमचंदानी (रा. दत्तात्रय दर्शन सोसायटी, त्र्यंबक रोड, नाशिक) यांची तिडके कॉलनीतील होळकर मार्गावर नवजीवन हॉस्पिटलच्या तळमजल्यावर केअर क्लिनिक व फार्मा नावाचे मेडिकल दुकान आहे. अज्ञात चोरट्याने या मेडिकल दुकानाचे, तसेच त्यांच्या शेजारील क्लिनिकचे शटर अशा दोन्ही शटरचे कान कशाच्या तरी सहाय्याने कापून आत प्रवेश केला. चोरट्याने ही घरफोडी करून दुकानात असलेली 1 लाख 19 हजार रुपयांची रोख रक्कम, 15 हजार रुपये किमतीचे डीव्हीआर मशीन, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने दि. 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यानच्या काळात चोरून नेला.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा. दं. वि. कलम 454, 457, 380, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आडके करीत आहेत