Home क्राईम इंदिरानगरला सव्वातीन लाखांची घरफोडी

इंदिरानगरला सव्वातीन लाखांची घरफोडी

0
संग्रहित छायाचित्र

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : घरातील सदस्य बाजारात गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सव्वातीन लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना वडाळा-पाथर्डी रोडवर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हेमंत राजेंद्र घोडेकर (रा. श्यामबन्सी अपार्टमेंट, विकास कॉलनी, इंदिरानगर) हे कुटुंबीयांसह काही कामानिमित्त काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बाजारात गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी चोरट्याने घरातील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटात असलेली 60 हजार रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 60 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 48 हजार रुपये किमतीचे 16 ग्रॅम वजनाचे कानातील चार जोड्या टॉप्स, 21 हजार रुपये किमतीच्या सात ग्रॅम वजनाच्या कानातील लोंबकळणार्‍या तीन रिंगा, 15 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 21 हजार रुपये किमतीच्या सात ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या साखळ्या, 15 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची वेढ्याची अंगठी, 24 हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे लहान मुलाचे सोन्याचे कानातील डूल, नऊ हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन नथी, तीन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम्पान, तीन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे आठ मणी, दोन हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, 600 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, 300 रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाचा चांदीचा कॉईन, तसेच 40 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 24 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.