नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : पत्नीवर संशय घेऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की फिर्यादी अनिता नितीन पाटील (रा. छोटी उमरी, ता. जि. अकोला) यांची बहीण शिल्पा रूपेश प्रधान हिच्यावर तिचा पती रूपेश केशव प्रधान (रा. बापू बंगला, वासननगर) हा नेमी संशय घेऊन मारहाण करून टॉर्चर करीत होता. वारंवार होणार्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात वॉचमन रूममध्ये झोळीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती रूपेश प्रधान याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.