नाशिक | प्रतिनिधी : जिल्ह्यातील नांदगाव येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा सापडला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोधही झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून कारवाईला सुरुवात झाली आहे.

याबाबत प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नांदगावमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या एका अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी आज सायंकाळी धाड टाकली असता ही कारवाई सुरू आहे.