Home क्राईम कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : विनापरवाना मुख्य रस्त्यावर गर्दी जमवून कोविड-19 च्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मयत राजेश वकील शिंदे याचा मृतदेह नातेवाईकांनी पेठ सिग्नल ते आर. टी. ओ. रोडवरील मुख्य रस्त्यावर ठेवला. विनापरवाना शंभर ते दीडशे स्त्री-पुरुषांची गर्दी जमवून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशा घोषणा देऊन आंदोलन केले. त्यांनी कुठल्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता रहदारीस अडथळा निर्माण केला.

तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तानाजी शिंदे, आजराबाई शिंदे, शिवा शिंदे, लहानी काळू चव्हाण, अनिल कांडेकर, रोहित जाधव, पिंटू चव्हाण, प्रेम शिंदे व त्यांचे शंभर ते दीडशे स्त्री-पुरुष सहकारी यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 143, 341, 188, साथरोग अधिनियम 1897, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.