Home क्राईम व्हॉट्सअ‍ॅपवर अवमानकारक मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

व्हॉट्सअ‍ॅपवर अवमानकारक मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी अवमानकारक शब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत रवींद्र लक्ष्मण गायकवाड (रा. शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित सूर्यप्रतापसिंग जयवंतसिंग सोलंकी (रा. देवळाली कॅम्प) याने दि. 26 नोव्हेंबर रोजी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस या समाजमाध्यमावर संविधानाविषयी अपशब्द लिहून अवमान केल्याप्रकरणी त्याला देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 295 (अ) सह अनुसूचित जाती-जमाती कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ करीत आहेत.