नाशिकरोड | भ्रमर वृत्तसेवा : जेलरोड येथील एका इमरातीच्या बंद फ्लॅटला आग लागल्याने घरातील वापरातील वस्तू जाळून खाक झाल्या.अग्निशामक दलाच्या बंबाने आग विझवली.

काल रात्री दहा वाजेच्या सुमारास जेलरोड येथील नवरंग कॉलनी, मंजुळा मंगल कार्यालय समोरील व्यंकटेश प्रसाद बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील बंद असलेल्या फ्लॅट मधून धूर येत असल्याचे काही रहिवाशांना दिसले. त्या नंतर लगेच आगीचे लोट दिसू लागल्यावर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला संपर्क केला. नाशिकरोड येथील एक बंबाच्या सहयायने काही वेळात आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

या वेळी रहिवासी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी पांगवली. काही वेळानंतर घर मालक सुरेश मधुकर पगारे घरी आल्यानंतर त्यांना घरातील फ्रीज, लाईट व इतर साहित्य जळालेल्या अवस्थेत दिसून आले. उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.