Home क्राईम विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पतीसह सासरच्या पाच जणांकडून होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जेलरोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिलेची मुलगी आशा ऊर्फ दिव्या नितीन ठाकरे ही सासरी नांदत असताना तिला पती नितीन धनराज ठाकरे (वय 31), सासरे धनराज राजाराम ठाकरे (वय 60), सासू जनाबाई ठाकरे (वय 50), दीर सूरज ठाकरे (वय 50), नणंद ताई ठाकरे (सर्व रा. श्रद्धा रो-हाऊस, ठाकरे मळा, पवारवाडी, जेलरोड) यांनी संगनमत करून काही कारणावरून कुरापत काढून विवाहितेला मानसिक त्रास दिला, तसेच पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत यासाठी तगादा लावला, तसेच “तू माहेरून पैसे आणले नाहीस, तर तुला नांदविणार नाही, तुला मारून टाकू,” अशी धमक फिर्यादीच्या मुलीस देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून आशा ठाकरे या विवाहितेने 19 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती.

दरम्यान या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 498 (अ), 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स. पो. नि. हांडोरे करीत आहेत.