मायलेकांस चौघांची मारहाण

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : किरकोळ भांडणाची कुरापत काढून चार जणांनी मायलेकास मारहाण करून घरातील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, दोघे जण फरारी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की भारती विनोद बायस (रा. संगमेश्‍वरनगर, चेहेडी पंपिंग) व त्यांचा मुलगा हे दुपारी तीन वाजता घरात झोपलेले होते. त्यावेळी मागील वादाच्या कारणातून आरोपी संदीप शिंदे ऊर्फ हुसळ्या (रा. एकलहरा रोड), रोशन पोपट सोनवणे (रा. रोकडोबावाडी), सागर किशन कोकणे, प्रशांत जाधव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून, तसेच त्यांच्याकडील लोखंडी रॉड व कोयत्यासारख्या हजाराने व हातोड्याने दरवाजा तोडून जबरीने घरात प्रवेश केला, तसेच घरातील गृहोपयोगी साहित्याचे नुकसान करून फिर्यादीस शिवीगाळ केली, तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली.

दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संदीप शिंदे व रोशन सोनवणे यांना अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!