नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या इसमाचे लक्ष विचलित करून त्यांच्याकडील 59 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाळकृष्ण रघुनाथ सोनवणे (रा. रघुकुल बंगला, हनुमानवाडी, नाशिक) हे दि. 20 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंद्रकुंड येथील शाखेत पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढून बंडल मोजत असताना दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. सोनवणे यांचे लक्ष विचलित करून 59 हजार रुपये किमतीच्या नोटांचे बंडल अनोळखी इसमांनी काढून घेत त्यांची फसवणूक केली.
दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कासले करीत आहेत.