नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे कोणी तरी अपहरण केल्याची फिर्याद पोेलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शंभूशरण केदार शर्मा (रा. राधाकृष्णनगर, सातपूर, नाशिक) यांचा मुलगा निशांत (राजाबाबू) शर्मा (वय 11) हा दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जातो, असे सांगून घरातून गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही.

दरम्यान कोणी तरी अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केल्याच्या संशयावरून सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.