लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचा पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : प्रियकराने आंतरजातीय विवाहास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्याच्या आवारातच मनगटावर ब्लेडने नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की एका अल्पवयीन मुलीचे एका मुलासमवेत प्रेमसंबंध होते. प्रियकराने नंतर आंतरजातीवरून त्या मुलीस लग्नासाठी नकार दिला. यामुळे तिची मानसिकता खराब झाली होती. रागाच्या भरात गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तिने सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या उजव्या हाताच्या मनगटावरील नस ब्लेडने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या प्रकरणी पोलीस नाईक माळोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!