इगतपुरी । भ्रमर वृत्तसेवा : इगतपुरीत वर्चस्वाच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून यामध्ये एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

राहुल साळवे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. राहुल साळवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे. संशयित मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे इगतपुरीचे नागरिक भयभीत झाले असून बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.
याबाबतची अधिक माहिती पुढील तपशील मिळाल्यावर अपडेट करण्यात येईल.
–