अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास अटक

नाशिक। भ्रमर वृत्तसेवा : ”तुला तुझ्या पप्पांकडे सोडतो,” असे सांगून अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या इसमास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पीडित मुलीचे आईवडील व आरोपी हे एकमेकांच्या घराजवळ राहतात. दरम्यान, आरोपी चेतन डोळस (रा. नाशिकरोड) याने पीडित अल्पवयीन मुलीस “तुला तुझ्या पप्पांकडे सोडतो,” असे सांगून जवळच असलेल्या एका बिल्डिंगमध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले, तसेच हा प्रकार कोणाला काही सांगू नकोस, असा दम दिला.

दरम्यान या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी चेतन डोळस याला अटक करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!