नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शालिमार येथे कपड्याच्या गाड्यावर कपडे खरेदी करणार्या महिलेच्या पर्समधील रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे 96 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सविता राऊसाहेब देशमुख (रा. श्रमिकनगर, सातपूर) ही महिला दि. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता खरेदीसाठी आली. शालिमार चौकातील एका कपड्याच्या गाड्यावर ही महिला कपडे खरेदी करीत होती. यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीजवळ असलेल्या पर्समधील 95 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 22 ग्रॅम वजनाचे दागिने व एक हजार रुपयांची रोकड असा सुमारे 96 हजार रुपयांचा ऐवज महिलेची नजर चुकवून चोरून नेला.

दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक काठे करीत आहेत.