नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : मोकळ्या जागेत पार्क केलेली तवेरा कार ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय शेषराव वाघमारे (रा. सम्राट कॉलनी, कबीरनगर, गंगापूर रोड) यांनी काल रात्री संत कबीरनगरमधील दिलीप धवसे यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एमएच 17 टी 1303 या क्रमांकाची 1 लाख 30 हजार रुपये किमतीची शॉरलेट तवेरा टर्बो कार मोकळ्या जागेत उभी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून नुकसान केले.

दरम्यान या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.