नोकराने लांबविले ड्रॉवरमधील सोन्याचांदीचे दागिने

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : सराफी दुकानातील नोकराने साफसफाईच्या बहाण्याने मालकाच्या केबिनमधील ड्रॉवरमधून सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना एका सराफी दुकानात घडली.

याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की शरणपूर रोडवरील एका सराफी दुकानात मयूर बाविस्कर हा साफसफाईचे काम करतो. बुधवार दि. 26 जानेवारी रोजी मालकाच्या केबिनमध्ये कोणीही नसताना साफसफाईच्या निमित्ताने त्याने केबिनमध्ये जात ड्रॉवरमध्ये असलेले 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन वाट्या व सोन्याचे चार मणी, 1800 रुपये किमतीचा चांदीचा ग्लास, चार हजार रुपये किमतीचे तीन जोड चांदीचे पायल, 60 हजार रुपये किमतीची सोन्याची लगड, 22 हजार 500 रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 9 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण 1 लाख 8 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान या प्रकरणी संदीप रामचंद्र देशपांडे (वय 45, रा. पवननगर) यांच्या फिर्यादीवरून मयूर बाविस्कर याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काकवीपुरे करीत आहेत. चोरलेले दागिने एका दुकानात विकण्यासाठी मयूर बाविस्कर गेला असता हा प्रकार उघडकीस आला

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!