Home क्राईम शहरात पाच मोटारसायकलींची चोरी

शहरात पाच मोटारसायकलींची चोरी

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र चालूच असून, काल वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच मोटारसायकली चोरीला गेल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोटारसायकलचोरीची पहिली घटना सारडा सर्कल येथे घडली. नाझीम खान (रा. मनमोहन अपार्टमेंट, नॅशनल ऊर्दू शाळेसमोर, सारडा सर्कल, नाशिक) यांनी दि. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नॅशनल ऊर्दू शाळेसमोर एमएच 15 बीक्यू 4982 या क्रमांकाची पॅशन प्रो मोटारसायकल पार्क केली होती; मात्र ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. खान मोटारसायकल घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांना मोटारसायकल जागेवर दिसली नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार भिल करीत आहेत.

मोटारसायकलचोरीची दुसरी घटना ओढा येथे घडली. सोमनाथ बाळू निकम (रा. निकमवाडी, ओढा, ता. जि. नाशिक) यांनी 28 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घराच्या ओहोळाजवळ एमएच 15 सीडब्ल्यू 8428 या क्रमांकाची 10 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल मध्यरात्री कधी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर निकम यांनी आडगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकलचोरीची फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लोहकरे करीत आहेत.

मोटारसायकलचोरीची तिसरी घटना महात्मानगर येथे घडली. सोनाली परमेश्‍वर स्वामी (रा. आशिष अपार्टमेंट, वैशंपायन विद्यालयाजवळ, महात्मानगर, नाशिक) यांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता एमएच 24 झेड 8566 या क्रमांकाची 15 हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टिव्हा मोपेड राहत्या बिल्डिंगमध्ये हॅण्डल लॉक करून पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने कधी तरी चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी आजूबाजूला चौकशी केली; पण मोटारसायकल मिळून आली नाही. स्वामी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात मोटारसायकलचोरीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस नाईक पगारे करीत आहेत.

मोटारसायकलचोरीची चौथी व पाचवी घटना मखमलाबाद येथे घडली. संजय सुरेश चौधरी (रा. श्रीकुंज सोसायटी, आदर्शनगर, म्हसरूळ लिंक रोड, मखमलाबाद) यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता एमएच 15 एफके 2809 या क्रमांकाची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल व एमएच 15 जीजे 2080 या क्रमांकाची 15 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल त्यांनी राहत्या घराच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या केल्या होत्या. या दोन्ही मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चौधरी यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला चौकशी केली; पण मोटारसायकल मिळून आली नाही. त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोन मोटारसायकलचोरीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.