नाशिक। भ्रमर वृत्तसेवा : मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातील चंदनाच्या झाडाच्या खोडाची अज्ञात चोरट्याने चोरी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस हवालदार गोपाल चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील बावळी बाग परिसरात कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानाजवळ चंदनाची झाडे आहेत. यापैकी सुमारे पाच हजार रुपये किमतीचे चंदनाच्या पाच झाडांचे खोड अज्ञात चोरट्याने स्वत:च्या फायद्यासाठी चोरून नेले.

दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धर्मवीर चव्हाण करीत आहेत.