नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाने ज्वलनशिल पदार्थात्या सहाय्याने आग लावून जाळल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रकाश नामदेव सांगळे (रा. जगताप मळा, नाशिकरोड) यांनी घराच्या पार्किंगमध्ये एमएच 15 जीबी 9398 या क्रमांकाची सुझुकी अॅक्सिस कंपनीची मोपेड पार्क केली होती. ही मोपेड आरोपी राहुल ऊर्फ सनी श्याम भाटिया (वय 25, रा. सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिकरोड) याने काल (दि. 1) मध्यरात्रीच्या सुमारास ज्वलनशिल पदार्थाच्या सहाय्याने आग लावून जाळली. यात मोपेडचे नुकसान झाले आहे.

दरम्यान याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात राहुल भाटियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.