नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याची कंठीमाळ गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तिवंधा चौकात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी वैशाली यशवंत खांदवे (रा. सोमवार पेठ, जुने नाशिक) ही महिला काल सायंकाळी सहा वाजता तिवंधा चौकातील साक्षी गणपती येथे दर्शनासाठी गेली होती. त्या ठिकाणी गर्दी असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने खांदवे यांच्या पर्समधील 45 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची कंठीमाळ नजर चुकवून चोरून नेली.

दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक खैरनार करीत आहेत.