नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : चूल पेटविताना साडीचा पदर पेटल्याने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ललिता यशवंत पालखे (वय 36, रा. जाधव संकुल, भवर टाऊनशिप, चुंचाळे शिवार) ही महिला काल सायंकाळी साडेसात वाजता राहत्या घरी चूल पेटवीत होती. त्यावेळी साडीचा पदर पेटल्याने तिच्या उजव्या हातास व पायास भाजल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाणी करीत आहेत.