नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ अज्ञात व्यक्तींनी सारडा सर्कल परिसरात वादग्रस्त पोस्टर लावले होते. मात्र पोलिसांना माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप करून ही पोस्टर जप्त केले आहे.
कर्नाटकामध्ये विद्यार्थिनींनी हिजाब वापरण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद नाशिक शहरात उमटले. शहरातील सारडा सर्कल परिसरामध्ये काही व्यक्तींकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध म्हणून ‘कर्नाटक सरकार बायकॉट, शरीयत कानून नही बदलेगा‘ अशा स्वरूपाचा निषेधाचा फलक लावला गेला होता.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने भद्रकाली पोलिसांनी धाव घेऊन पोस्टर जप्त केले आहे. मंगळवारी मालेगाव येथेही मुस्लिम समाजाने बैठक घेऊन कर्नाटक शासनाचा निषेध केला आहे.