शिकाऊ उमेदवारांना शिक्षुता प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे अंतिम राष्ट्रीय शिक्षुता (Apprenticeship) प्रमाणपत्र जिल्ह्यातील सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी शिकाऊ उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र त्वरीत घेवून जावे, असे आवाहन सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर.एस. उनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सत्र 1980 पासून ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत उत्तीर्ण झालेल्या बहुतांशी उमेदवारांनी आपले शिक्षुता प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले नाही. याकरीता मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, नवी दिल्ली यांच्या मार्फत अंतिम राष्ट्रीय शिक्षुता (National Apprenticeship Certificate) प्रमाणपत्र जिल्ह्यातील सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी मुळ गुणपत्रिका, आधारकार्ड किंवा ओळखपत्राची एक सत्यप्रत सादर करणे बंधनकारक आहे. असेही सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर.एस. उनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!