जिल्हा बँकेने जप्त केलेल्या ‘इतक्या’ ट्रॅक्टरांचा सटाणा येथे लिलाव

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : जिल्हा बँकेची वाहन / ट्रॅक्टर कर्जेची मोठी थकबाकी झालेली असून त्यापैकी आजपावेतो जिल्ह्यातील एकूण २३८ वाहन / ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत. त्यानुसार आज रोजी सटाणा तालुक्यातील २३ ट्रॅक्टर जप्त केलेले होते. ट्रॅक्टरची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त करून दिनांक ०८.०२.२०२२ रोजी इंजमाने, नामपूर तालुका सटाणा येथे जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. त्यापैकी आज १ थकबाकीदाराने त्याच्याकडील थकबाकीचा भरणा केल्याने उर्वरीत २२ ट्रॅक्टरची लिलावप्रक्रिया पार पडली आहे.

सदर लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद मिळाला असून २१ ट्रॅक्टरचा लिलाव झालेला आहे. लिलावापोटी रक्कम रु ५५ लाख ८२ हजार लाख बँकेस प्राप्त झालेले आहेत १ सभासदाने ट्रॅक्टरची थकबाकी लिलावाच्या जागेवरच भरणा केल्याने ट्रॅक्टर सभासदास परत देण्यात आला.

उर्वरित १ ट्रक्टराचा लिलाव स्थगीत करण्यात आला आहे. सदर सभासद हे सन २००१ ते २०१२ ह्या कालावधीतील थकबाकीदार आहेत. बँकेने वारंवार कर्ज मागणी नोटीसा देऊनही व सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नसल्यामुळे सदरची कार्यवाही केलेली आहे. सदर लिलावा प्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक श्री नितीन ओस्तवाल, वसुली अधिकरी श्री.प्रदीप (रमेश ) शेवाळे, विभागीय अधिकारी श्री सूर्यवंशी, सटाणा तालुका पालक अधिकारी व्यवस्थापक श्री राजेंद्र भामरे,हेमंत भामरे,रवींद्र पगार,निलेश भामरे,तुषार अहिरे तसेच विका संस्थेचे सचिव यांनी लिलाव प्रक्रियेस उपस्थित राहून सहकार्य केले आहे.

तसेच पुढील लिलाव उद्या दिनांक०९.०२.२०२२ रोजी वडनेर भैरव तालुका चांदवड येथे व दिनांक ११.०२.२०२२ रोजी देवळा येथे होणार आहेत. तरी जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे पुनश्च आवाहन बँकेच्यावतीने करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!