सिन्नरला आगीत फुटवेअरचे दुकान जळून खाक

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : सिन्नर येथे भरबाजारपेठेतील शिवाजी चौकात असलेल्या एका चप्पल-बूटाच्या दुकानास आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आगीच्या ज्वाळा बाहेर पडताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविेले. अग्निशमन दलाने नगरपालिकेच्या दोन बंबासह एमआयडीसीचा एक बंब बोलावून आग आटोक्यात आणली. तसेच सकाळी  7 च्या सुमारास लागलेली आग साडेदहा वाजेपर्यंत धूमसत होती.

दरम्यान दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात चप्पल-बूट व इतर पादत्राणे असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला. तसेच ही आग अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी  दुकानाचे शटर तोडून आटोक्यात आणली.  तर आग आटोक्यात आणण्यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी लाला वाल्मिकी, जयेश गोडसे, नवनाथ जोंधळे, सागर डावरे, मंगेश कट्यारे, यशवंत बेंडकुळे, मनोज भोळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!