नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ .भारती पवार महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत, नाशिकचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ, कृषिमंत्री ना.दादा भुसे, नाशिक जिल्ह्यातील आमदार तथा विजवीतरण महामंडळाचे सर्वच वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुबई येथे मंत्रालयात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या विविध प्रश्नसंदर्भात बैठक पार पडली. ह्यात अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीत ना.डॉ.भारती पवार यांनी आक्रमक होत “शेतकरी आधीच संकटात असतांना विजबिले थकीत असल्याने त्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत .आधीच संकटाच्या खाईत सापडलेल्या शेतकरी ह्यामुळे अजून उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आता शेतकऱ्यांना मदतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. म्हणून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करता त्यांच्या भावनांशी खेळू नका तो त्वरित सुरळीत करा” असे स्पष्ट शब्दात ना .डॉ. भारती पवार यांनी या बैठकीत आपली भूमिका मांडली.

तसेच युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दुष्काळ व शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती बघता व शेतकऱ्यांना पूरक असे निर्णय घेत वीज कनेक्शन कट न करता शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्याची भूमिका घेत अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले होते. शेतकऱ्यांना वीज मिळत होती पण दुर्दैवाने आज शेतकरी हिताच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलली जात नसल्याची खंत ही ना.डॉ.भारती पवार यांनी बोलून दाखवली.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, पिके निघाल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीज बिलांची आकारणी करावी अशाही सूचना केल्या ह्या बैठकीत ना.डॉ.भारती पवार आक्रमक झाल्या होत्या. ह्या बैठकीत शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट केले जातेय त्यासाठी त्यांना पूर्वसूचना द्या. तसेच सध्या शेतीचा हंगाम चालू आहेत शेतात पिके उभी आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बघता त्यांच्या पिकांना पाणी भरण्यासाठी विजेची आवश्यकता आहे पण परिस्थिती अभावी ते वीजबिल भरू शकत नसतील तेव्हा आपण वीजबिल भरणा हा पिके निघाल्यावर त्यांच्याकडून भरून घ्यावा. आता पिकेच आली नाही तर ते विजबिले भरू शकणार नाही. सध्या कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे महापारेषांन कंपनीने लक्ष घालून तो सुरळीत करावा जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित रित्या वीज मिळू शकेल. MSEB च्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची विजेसंदर्भातील अनेक कामे निधीअभावी प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे त्याकरता राज्यशासनाने त्यांना जिल्हा नियोजन (DPDC) च्या माध्यमातून त्वरित निधी उपलब्ध करून घ्यावा जेणेकरून निधीअभावी विजमंडळाची कामे अडकणार नाही.
कळवण, सुरगाणा ,पेठ दिंडोरी भागासाठी देवसाने येथे 220 kv किंवा 132 kv चा प्रस्ताव राज्यशासनाकडे जाऊन तो मंजूर झाला आहे त्याचे काम महापारेषणने लवकरात लवकर सुरू करावे. त्यामुळे ह्या तालुक्यातील वीज प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. निफाड तालुक्यातील दोन ऍडिशनल ट्रान्सफार्मर करंजगाव आणि भेंडाळी येथे मंजूर आहेत पण त्यांची कामे अजून सुरू झाली नाही ती तातडीने पूर्ण करावी. तसेच निफाड तालुक्यातील दारणासांगवी येथे 33kv , चांदवड तालुक्यातील तिसगाव, खंडाळवाडी, दरेगाव येथील 33kv च्या सबस्टेशन चे प्रस्ताव पाठवलेले आहेत ते ही तात्काळ मंजूर करून त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणीही ना.डॉ.भारती पवार यांनी ह्या बैठकीत केली.
तसेच जळालेली डीपी लवकर मिळत नाही, विजबिले भरूनही लवकर वीज जोडणी होत नाही, शेतकऱ्यांना नवीन dp मिळण्यासाठी ही दोन दोन वर्षे थांबावे लागते. नवीन डीपीची मागणी करून सुद्धा त्यांना ती लवकर मिळत नाही. ह्याकडेही संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले .पारंपरिक विजेचा वापर करत असतांना सौर उर्जेचाही प्रभावी पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी ना.डॉ.भारती पवार यांनी केली.