सातपूरच्या निलराज इंडस्ट्रीज कंपनीत भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

सातपूर | भ्रमर वृत्तसेवा : सातपूर औद्योगिक वसाहती मधील कपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आग लागलेल्या परिसरात कोणीही नसल्याने जीवित हानी टळली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान सदर कंपनीला आग लागली. मनपा अग्निशमन दलास संपर्क केला असता , अग्निशमन दलाचे 3 बंब, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचा 1 बंब, एमआयडीसीचा 1 बंब यांच्या सहाय्याने 8 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर  सकाळी 10 वाजेपर्यंत  कुलिंगचे काम सुरू होते. आगीमध्ये पहिला मजला संपूर्ण जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचा कपॅसिटर बनवण्यास लागणारा कच्चा माल भस्मसात झाला.

दरम्यान या आगीचे कारण अद्याप निश्‍चित समजू शकले नसून आग आटोक्यात आणण्यासाठी नाशिक मनपा अग्निशमन केंद्र प्रमुख राजेंद्र बैरागी, व पी.जी परदेशी, आर.ए लाड यांच्या एकूण 25 कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. पहाटेच्यावेळी आग लागल्यामुळे पहिल्या पाळीला कामावर जाणार्‍या कामगारांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!