Home Latest गंगापूररोडवरील ‘या’ हॉटेलवर मनपाचा हातोडा

गंगापूररोडवरील ‘या’ हॉटेलवर मनपाचा हातोडा

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज जोरदार कारवाई करीत गंगापुरोडवरील एक हॉटेल जमीनदोस्त केले.

पुष्कर वैशंपायन यांच्या मालकीचे हॉटेल मॉर्डन कॅफे हॉटेल अनेक वर्षापासून अनधिकृतपणे बांधकाम करून दोन मजली इमारतीमध्ये हॉटेल सुरु होते. मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको विभागीय अधिकारी मयूर पाटील, सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी मोहन हरिश्चंद्र यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक, बांधकाम आणि नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि 15 पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.

महापालिकेच्या पथकाने सदर हॉटेलचे पूर्ण अनधिकृत बांधकाम तोडले. यापोटी मनपाने कारवाई साठी संबंधित अतिक्रमधारकाकडून 1 लाख 36 हजार रुपये वसूल केले. सदर व्यक्तीने 40 फूट बाय 40 फूट अनधिकृत बांधकाम केलेले होते.