नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी 53.52 कोटी आरंभीच्या शिलकेश रुपये 2227.05 कोटी जमेचे व रुपये 2219.02 कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. तसेच सन 2022-2023 च्या मूळ अंदाजपत्रकनुसार अखेरची शिल्लक रक्कम रुपये 8.03 कोटी दर्शविण्यात आली आहे.

कोणत्याही करवाढ आणि दरवाढीचा या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आलेला नाही, असे मनपा आयुक्तांनी सांगितले. शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनिस्सारण, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन, आदी सुविधासह आयटी हब, स्मार्ट स्कुल, नमामी गोदा, पर्यावरण, वैद्यकीय सेवा यावर विशेष भर देण्यात आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले
