नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शेकोटी करून शेकत असताना लुगड्याचा पदर पेटून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई पुरुषोत्तम जोशी (वय 95, रा. निलगिरी बाग, औरंगाबाद रोड, नाशिक) ही महिला काल राहत्या घरी टोकरीत शेकोटी करीत शेकत होती. त्यावेळी तिच्या लुगड्याचा पदर शेकोटीवर पडल्याने पदराने पेट घेतला. यात तिचा चेहरा, डावा हात व बरगडी भाजल्याने त्यांना नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

दरम्यान या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.