नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : अज्ञात वाहनाच्या दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना अंबड येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष रामदास शेटे (वय 58, रा. भगूर, ता. जि. नाशिक) हे दि. 11 जानेवारी रोजी मोटारसायकलीने नाशिकरोडकडे जात असताना स्टेट बँक पुलाच्या खाली त्यांच्या मोटारसायकलीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्या मुलाने प्रथम लाईफ केअर हॉस्पिटल व नंतर जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिनर्जी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना काल त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक महाजन करीत आहेत.