हेल्मेट न घालणे बेतले ‘त्याच्या’ जिवावर

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : भरधाव मोटारसायकल स्लीप झाल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना म्हसरूळ येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दीपक कांतीराम चारोस्कर (वय 29, मु. पो. रासेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हा दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता एमएच 15 एचटी 3216 या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीने पेठ रोडवरील म्हसोबा बारी, म्हसरूळकडे जात होता. मोटारसायकल वेगात असल्याने ती रस्त्यावर स्लीप झाली. त्यावेळी रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार चारोस्कर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी पोलीस हवालदार आसिफखान पठाण यांच्या फिर्यादीनुसार मयत दीपक चारोस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!