नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : नाशिक महापालिकेची बहुप्रतीक्षित मनपा प्रभागरचना आज घोषित झाली आहे. त्यामुळे एक प्रकारे महापालिका निवडणूक प्रक्रियेलाच कधी प्रारंभ होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात मनपा प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी ही प्रभागरचना जाहीर केली आहे. यामुळे एक प्रकारे मनपा निवडणूक प्रक्रियेला चालना मिळाल्याचे मानले जात आहे. आता निवडणुका कधी घोषित होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रभाग रचनेचा आराखडा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://nmc.gov.in/home/getfrontpage/184/133/M#tabs|History:tab2_1
यंदाच्या निवडणुकीत पूर्वीच्या चार सदस्यांची प्रभागरचना बदलून तीन सदस्यांची करण्यात आली आहे, तसेच मध्यंतरी कोरोनाची तिसरी लाट आली. त्यामुळे नवीन प्रभागरचनेला उशीर झाला आहे; मात्र आज प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे मनपा राजीव गांधी मुख्यालय, तसेच महापालिकेच्या सर्व म्हणजे सहा विभागीय कार्यालयांत ही नवीन प्रभागरचना इच्छुक नगरसेवक व नागरिकांना पाहायला मिळणार आहे, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरूपात नवीन प्रभागरचना पाहायला मिळणार आहे.