एसएसके प्रिमियर लिगमध्ये आयुष ठक्कर, साहिल पारख यांच्यावर सर्वाधिक बोली

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : एसएसके प्रिमियर लिगला 1 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.त्यासाठीची लिलाव प्रक्रिया आज शहरात पार पाडली. या लिलाव प्रक्रियामध्ये अष्टपैलू खेळाडू आयुष ठक्कर हा सर्वाधिक 14500 पॉईटला विकला गेला तर त्यापाठोपाठ साहिल पारख हा 12000 पॉईटला विकला गेला. नाशिक प्रिमियर लिग नंतर आयपीएलच्या धर्तीवर पहिलीच स्पर्धा आहे.

गंगापूररोडवरील हॉटेल करीलिव्ह येथे हि लिलाव प्रक्रिया ऑनलाईन युट्यूबवर पार पाडली. या प्रक्रियेत एकूण सहा संघमालकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत अद्वैत वॉरियर्स, एनएसीए स्ट्राईक, एस.एस.के. क्रांती टायगर्स,यक्ष योद्धा, एनएसएफए स्पार्टनर आणि नाशिक लायन्स या संघांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अडीचशेपेक्षा अधिक क्रिकेटपटूंनी  नावे नोंदविली होती. त्यात खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर त्यांची ऑनलाईन बोली लावण्यात येवून निवड करण्यात आली. आयुष ठक्कर, साहिल पारख यांच्यापाठोपाठ, जिशान खान (7 हजार 600 पॉईंट), मोहम्मद ट्रंकवाला(4100 पॉईंट), चेतन लोहार (2600 पॉईंट), तनपुरे (3500 पॉईंट), सुजीत यादव(6100)  यांना बोली लागली. दरम्यान, एसएसके प्रिमियर लिग नायगाव येथे 1 फेब्रुवारीपासून खेळविण्यात येणार असून,प्रत्येक सामना 25 षटकांचा राहणार आहे.

या लिलाव प्रक्रियेचे औपचारिक उद्घाटन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक कुणाल कातकाडे,विक्रम उगले, संघमालक विष्णू जाधव, संजय गायकवाड,सतिश गुप्ता, अरूण शेळके,  गोपाळ राठोड,विजय सोनवणे, भाविक मंकोडी, शांताराम मेणे, संदीप सेनभक्त, सतिश गायकवाड  आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!