नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : नीट पीजी परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र या परीक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून 12 मार्च रोजी होणारी नीट पीजी 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी ही परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती. परंतु आरोग्य मंत्रालयाने ही परीक्षा आता 6 ते 8 आठवडे पुढे ढकलली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे मे-जून 2022 मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी होती. तसेच आता ही परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या शिवाय परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा देखील लवकरच होऊ शकते.

http://https://twitter.com/ANI/status/1489463831315185666
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण होईपर्यंत परीक्षेची तारीख वाढवण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. यात राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, एनबीई द्वारे आयोजित नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती.