मुंबई :- कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे 68वे वर्ष आहे.

हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. शास्रीय गायक राहुल देशपांडेला पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. बेस्ट ज्युरी फिचर फिल्मसाठी ‘जून’ सिद्धार्थ मेनन सिनेमाची निर्मिती प्लॅनेट मराठीने केली आहे. ‘अवांचित’ आणि ‘गोदकथा’ या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार मिळाला. नॉन फिचर्स फिल्ममध्ये कुंकूमार्चन या मराठी सिनेमाला पुरस्कार मिळाल आहे.

गोष्ट एका पैठणीची हा मराठी सिनेमा उत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.