महाविकास आघाडीला धक्का : सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती.

त्यानंतर या प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला असून राज्यातील 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!