Home देश हिमाचलप्रदेशच्या किन्नौरमध्ये महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू

हिमाचलप्रदेशच्या किन्नौरमध्ये महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू

0

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : हिमाचल (Himachal Pradesh) प्रदेशच्या किन्नौरमध्ये (Kinnaur) हिमवर्षाव (heavy snowfall ) झाल्याने 3 ट्रेकर्सचा मृत्यू (3 trekkers die) झाला आहे. सध्या 17 व्या बटालियन इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची (ITBP) टीम शोध आणि बचाव कार्य करत आहे. धक्कादायक म्हणजे 13 जणांच्या ट्रेकर्स ग्रुपमध्ये 12 जण हे महाराष्ट्र राज्यातील आहेत.

दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या (trekkers) ग्रूपमधील 11 जणांचा मृत्यू झाला होता. 13 ट्रेकर्स (महाराष्ट्रातील 12 आणि पश्चिम बंगालमधील 1) यांनी 17 ऑक्टोबरला रोहरू ते विलेज-बुरुआ, तेह-सांगला, जिल्हा-किन्नौरपर्यंत ट्रेकिंगला सुरुवात केली. बुरुआ कांडा वरच्या भागात बर्फ पडल्यामुळे हे सर्व ट्रेकर्स तिथे अडकले होते.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हिमवर्षावामध्ये राजेंद्र पाठक, अशोक भालेराव, दीपक राव, या 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जणांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे. जवळपास 15 हजार फुटांवर ट्रेकर्संचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शोधण्यासाठी आयटीबीपीची टीम आज घटनास्थळी दाखल झाली आहे.