Budget 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल; बजेटआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात सर्वांचे लक्ष अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणा-या केंद्रीय अर्थसंकल्प-2022 कडे असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्या नावावर सर्वाधिक प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम आहे.

तसेच यावेळी कोरोना संकटामुळे दोलायमान झालेली देशाची अर्थव्यवस्था कोरोनापूर्व पातळीवर आली असून ती आगामी आर्थिक वर्षांतील (२०२२-२३) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याइतकी मजबूत होऊ लागली आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर ८ ते ८.५ टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उमटला. दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. तर कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यस्थेला या अर्थसंकल्पामुळे गती मिळेल तसेच सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प (Budget 2022) पूर्णपणे डिजिटल असणार आहे. हरितक्रांतीला चालना देण्यासाठी यंदा हरित अर्थसंकल्पाची कल्पना राबवली जाणार आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांचा पोतडीतून काय निघणार असे बोलण्याऐवजी त्यांच्या टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे हे पाहावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थंसकल्पीय अधिवेशनाकडे जगाच्या नजरा लागल्या असल्याचे म्हटले आहे. तर निर्मला सितारामन यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. तसेच नोकरदार,उद्योजक, शेतकरी, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहावे लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!