मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : 1993 मुंबई बाॅम्ब स्फोटातील (1993 blast mumbai) आरोपी अबू बकरला (Abu Bakar) युएई मधून अटक करण्यात आल्याचा दावा एजन्सीने केला आहे. त्याला पून्हा भारतात आणण्याची कायदेशीरप्रकियाही सुरू असल्याचे सांगितले जाते आहे.

अबु बकरला 2019 मध्ये भारतात आणण्याचे प्रयत्न तपास यंत्रणांनी केले होते, मात्र तांत्रिक गोष्टींमुळे आणता आले नव्हते. अबु बकरवर स्फोटासाठी RDX पुरवल्याचा आरोप होता. तसेच बाॅम्ब (Bomb) बनवण्याच्या ट्रेनिंगही वेळीही तो उपस्थित होता. सीबीआयने दुसऱ्या एजन्सीच्या मदतीने त्याला अटक केली आहे.

दरम्यान मुंबईमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवले होते. हा देशातील सर्वांत मोठा बॉम्बस्फोट असल्याचे सांगितले जाते. या बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर, ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.दरम्यान या अबू बकर यांचे पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. तो दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्याने आखाती देशांमधून सोने, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे.