नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू इस्लामाबादपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमारेषेजवळ असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे जाणवले. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की चंदीगड आणि दिल्ली एनसीआर परिसरामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

Jolts of earthquake felt in Kashmir, Noida and other areas. Details awaited.
— ANI (@ANI) February 5, 2022
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील काबूलपासून २५९ किलोमीटर उत्तर-पूर्व, ताजिकिस्तानमधील दशानबेपासून ३१७ किलोमीटर दक्षिणपूर्व आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादपासून ३४६ किलोमीटर उत्तर – पश्चिम असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजिने दिली आहे.
दरम्यान या भूकंपामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली असून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.